

जळगावः जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन अवैध शस्त्रांवर आळा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच एरंडोल जळगाव एमआयडीसी आणि आता शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोळीबराच्या घटना झालेल्या आहे. या गोळीबार मध्ये दोन जण जखमी झाले असून एक जण जिल्हा रुग्णालय उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. तर दुसरा जखमी कुठे आहे याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच आठवड्यात एका मागून एक घटना गोळीबाराच्या घटना घडत आहेत.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री एका कंपनीच्या बाहेर अवैध दारू विक्री मधून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये पती-पत्नी आरोपी असून यामधील एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर दुसऱ्या घटनेमध्ये एरंडोल येथे बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे एक जण जखमी झालेला आहे. मात्र गोळी का चालवण्यात आली हा सर्वात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. तर आज शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन जणांमध्ये गोळीबार झाल्याची घटना रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर दुसऱ्या जखमी हा कोणत्या रुग्णालय याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार का झाला कसा आला याबाबत पोलीस सूत्रांना कोणतीच माहिती नाही
जळगाव जिल्ह्यामधील अवैध शस्त्र पकडण्यात पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली होती. गोळीबार सारख्या घटना त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये हद्दीत होत आहे म्हणजे यामधून शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्रे मोठ्या प्रमाणात येत असल्याची चर्चा सुरू आहे. जे शनिपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी सध्या कार्यान्वित आहेत त्यांनी चोपडा येथे असताना एका मागून एक शस्त्र साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला होता. मग त्यांच्या हद्दीमध्ये रात्री बे रात्री आता फायरिंग का होते हा प्रश्न उपस्थित होत आहे.