

जळगाव | जळगाव जिल्हा हा केळी, कापूस, ज्वारी, ऊस व इतर सर्व उत्पादनासाठी ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यातील केळी ही भारतातच नव्हे तर विदेशातही चांगल्या दर्दीची म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये 690 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील 438 प्रकरणे पात्र झाले आहे तर 225 अपात्र ठरले आहेत तर प्रलंबित 27 प्रकरणे आहेत.
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाही आहे. याचा फटका जळगाव जिल्ह्यालाही बसलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विचार केला असता 2021 ते 2024 या चार वर्षाच्या कालावधीमध्ये 690 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये 438 शेतकऱ्यांची आत्महत्याची प्रकरणे पात्र झालेली आहेत तर 225 शेतकऱ्यांची आत्महत्येचे प्रकरणे अपात्र ठरलेली आहेत. 2024 मधले सप्टेंबर व नोव्हेंबर डिसेंबर या मधले 27 प्रकरणे प्रलंबित आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विचार केला असता 2021 मध्ये 175, 2022 मध्ये 196, 2023 मध्ये 151 तर 2024 मध्ये 168 अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
सर्वाधिक आत्महत्या चार वर्षांमध्ये 2022 मध्ये 196 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत
महिने. एकूण पात्र. अपात्र.
जानेवारी 61 46. 16
फेब्रुवारी 57 30. 27
मार्च 61. 40. 21
एप्रिल 42. 30. 11
मे 51. 39. 12
जून 65. 49. 16
जुलै 54. 26. 28
ऑगस्ट 45. 30. 15
सप्टेंबर 73. 42. 30
ऑक्टोबर 48. 33. 15
नोव्हेंबर. 63. 40. 18
डिसेंबर. 70. 34. ..15
एकूण. 690. 438. 225
तर 2024 मधील सप्टेंबर महिन्यात एक नोव्हेंबर महिन्यात पाच डिसेंबर महिन्यात 21 असे प्रकरणे प्रलंबित आहेत.