

जळगाव : पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावात मका लागवड करत असतांना अचानक वीज पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहित जगतसिंग पाटील असे मयत 25 वर्षीय शेतकरी तरुणाचे नाव आहे.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात मक्का लागवड करत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहित याला वीज पडल्यानंतर तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉ. अक्षय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले.