Liquor Seizure Jalgaon | जळगावात अवैध दारू अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ४४.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

८ वाहनांसह १८७ संशयितांना अटक; ८५ हजार लिटर कच्चे रसायन केले नष्ट
Excise Department Raid
Excise Department Raid Pudhari
Published on: 
Updated on: 

Jalgaon Excise Department Raid

जळगाव : जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवली आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात करण्यात आलेल्या विशेष कारवाईत तब्बल २२२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १८७ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान आठ वाहने आणि दारूसाठ्यासह एकूण ४४ लाख ८१ हजार ८७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्या, बेकायदेशीर मद्यविक्री तसेच दारूच्या तस्करीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी ऑक्टोबर महिन्यात विविध ठिकाणी अचानक छापे टाकले. या मोहिमेत अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. कारवाईत ३ हजार ८५६ लिटर हातभट्टी दारू, २८४ लिटर देशी दारू, २३८ लिटर ताडी, १८ लिटर विदेशी मद्य आणि ४९ लिटर बिअर असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

Excise Department Raid
Jalgaon News | ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; शिरसाळा पाझर तलावाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

८५ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट

हातभट्टी दारू तयार करण्यासाठी विविध ठिकाणी साठवून ठेवलेले तब्बल ८५ हजार ३४५ लिटर कच्चे रसायन (वॉश) उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शोधून काढले. हे रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. तसेच अवैध दारूची वाहतूक आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारी आठ वाहनेही जप्त करण्यात आली.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि तस्करीविरोधातील ही मोहीम आगामी काळातही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.