

जळगाव : जळगाव जिल्ह्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 18 नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आतापर्यंत नगरसेवक पदासाठी 239 नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी 12 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे. शुक्रवार (दि.14) रोजी 177 नगरसेवक पदासाठी तर सात नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बिगुल वाजला असून निवडणुकीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. नगराध्यक्ष लोकनियुक्त असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झालेली आहे तर नगरसेवक पदासाठी ही मोठ्या प्रमाणात 18 नगरपालिकांमध्ये चुरस दिसून येत आहे यामध्ये मुख्यतः अमळनेर नगर परिषदेमध्ये आतापर्यंत 53 एकूण अर्ज दाखल झालेले आहे तर वरणगाव मध्ये 30 जामनेर मध्ये 24 भुसावळमध्ये 15 रावेरमध्ये 18 तर पाचोरा मध्ये 19 असे अर्ज दाखल झालेले आहेत. शुक्रवार (दि.14) रोजी 177 नगरसेवक पदासाठी नामनिर्देशक पत्र दाखल झाले असून लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी सात अर्ज दाखल झालेले आहेत.
सोमवार (दि.10) पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे तर शुक्रवार (दि.14) पर्यंत एकूण 239 नगरसेवक पदासाठी तर 12 नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. यामध्ये भुसावळ 11, अंमळनेर 29, चाळीसगाव दोन, चोपडा पाच, जामनेर 23, पाचोरा 14, यावल सहा, नशिराबाद चार, वरणगाव 20, पारोळा 9, भडगाव 5, धरणगाव 8, रावेर 16, एरंडोल एक, वैजपूर 9, शेंदुर्णी 6, मुक्ताईनगर 5 असे एकूण 177 नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झालेले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भुसावळ 1, अंमळनेर 1, जामनेर 2, वरणगाव 1, धरणगाव 1 आणि शेंदुर्णी 1 असे 7 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत