

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : म्हसावद (जि. जळगांव) येथे आज (दि. 13) एका लग्नसमारंभात मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. म्हसावद, जि.जळगाव येथे आज जिग्नेश चिंचोरे आणि चिन्मयी कंखरे यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह प्रसंगी एक अनोखा उपक्रम राबवला गेला. या उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ घेत जनजागृती करण्याचे काम करण्यात आले. वर-वधू ,उपस्थित सर्व वर्हाडी मंडळी,ग्रामस्थ यांनी शपथ घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचा निश्चय केला.
या प्रसंगी थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी, उपमुख्याध्यापक जी डी बच्छाव, सी एम राजपूत, पी पी मगरे, क्रिडा शिक्षक राहूल गिरासे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार उपस्थित होते.