नाशिक विभागीय युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी

विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
jalgaon
नाशिक विभागीय युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजीfile
Published on
Updated on

जळगाव | युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र संघटन जळगाव यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे दि. १० डिसेंबर रोजी करण्यात आले.

या महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नयना महाजन झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, ॲडव्होकेट भारती कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवामध्ये नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, नाशिक व जळगाव या जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व, कथालेखन, कविता लेखन, चित्रकला, विज्ञान संशोधन प्रकल्प इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. या विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याने वर्चस्व राखले.

महोत्सवामध्ये विजयी झालेले संघ व स्पर्धांकांची नावे 

लोकगीत प्रथम- क्रमांक कान्ह ललित कला केंद्र जळगाव

द्वितीय क्रमांक- पूज्य साने गुरुजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय,नंदुरबार.

तृतीय क्रमांक- एपीजे कला वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी नाशिक.

वक्तृत्व स्पर्धा- प्रथम क्रमांक- जिज्ञासा गणेश पाटील, जळगाव

द्वितीय क्रमांक- विवेक मनोज पाटील, जळगाव

तृतीय क्रमांक- आकांक्षा विजय सोनवणे, धुळे

कथा लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- ऐश्वर्या प्रल्हाद पाटील जळगाव

द्वितीय क्रमांक- पवन सुभाष सावकारे जळगाव

तृतीय क्रमांक- विशाल रमेश गावित नंदुरबार

कविता प्रकारामध्ये प्रथम क्रमांक- रसिका मुकुंद ढेपे जळगाव.

द्वितीय क्रमांक- अथर्व विश्वास केळकर नाशिक.

तृतीय क्रमांक- अंजली सुभाष माळी नंदुरबार

चित्रकलामध्ये प्रथम क्रमांक- कुणाल विष्णू जाधव जळगाव.

द्वितीय क्रमांक -समय अजय चौधरी जळगाव

तृतीय क्रमांक- तेजस अनिल चौधरी नाशिक

लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- कान्ह ललित केंद्र जळगाव

द्वितीय क्रमांक- एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल नंदुरबार

तृतीय क्रमांक- एम के शिंदे विद्यालय कुसुंबा धुळे

सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या आणि प्रसिद्ध कलाकार हेमंत पाटील त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यांनी या सहभागी युवा कलाकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे, सचिन निकम, विशाल बोडके, प्रा. प्रसाद देसाई, एम.जे.महाविद्यालय, जळगाव, जगदीश चौधरी, तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, चंचल माळी, विनोद कुलकर्णी, विनोद माने, काजल भाकरे, आदींनी परिश्रम घेतले. सर्व विजयी संघ हे नांदेड येथे 13 डिसेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news