Jalgaon Fire | धरणगावात अग्नितांडव; लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे १० हेक्टरवरील मका जळून खाक

पिंपळे शिवारात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग: ४ शेतकऱ्यांची लाखोंची कमाई मातीमोल; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका
Short Circuit Fire 10 Hectare Crop Loss Dharangaon
भीषण आगीत तब्बल १० हेक्टर क्षेत्रावरील कापून ठेवलेला मका जळून खाकPudhari
Published on
Updated on

Short Circuit Fire 10 Hectare Crop Loss Dharangaon

जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात महावितरणच्या नाकर्तेपणाचा आणखी एक भीषण फटका बळीराजाला बसला आहे. तालुक्यातील पिंपळे शिवारात महावितरणच्या लोंबकळणाऱ्या वीज तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तब्बल १० हेक्टर क्षेत्रावरील कापून ठेवलेला मका जळून खाक झाला आहे. या 'अग्नीतांडवा'त चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न करणाऱ्या महावितरणविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रारींची कचराकुंडी; शेतकऱ्यांचा आरोप

शेतशिवारातून जाणाऱ्या महावितरणच्या वीज तारा अनेक दिवसांपासून धोकादायक पद्धतीने लोंबकळत होत्या. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात लेखी आणि तोंडी स्वरूपात अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, "साहेबांना" वेळ नसल्याने या तारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच लोंबकळणाऱ्या तारांचा एकमेकींना स्पर्श होऊन ठिणगी पडली आणि पाहता पाहता सोन्यासारखा मका राख झाला. "जर वेळेत दुरुस्ती केली असती, तर आज आमचे घर उघड्यावर पडले नसते," असा संतप्त सवाल बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

Short Circuit Fire 10 Hectare Crop Loss Dharangaon
Jalgaon News: जळगावकरांनो पाणी जपून वापरा! हातनूर धरणातील साठा गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटला

१० हेक्टरवर राखेचे साम्राज्य

कापून ठेवलेला मका विक्रीला काढण्याच्या तयारीत असतानाच नियतीने घाला घातला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, काही क्षणांतच ४ शेतकऱ्यांच्या शिवारातील मका जळून कोळसा झाला. यामध्ये १० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

आग लागल्यानंतर आता सरकारी यंत्रणा आणि पंचनाम्यांचे सोपस्कार सुरू होतील. मात्र, महावितरणच्या चुकीमुळे झालेल्या या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आणि भरीव शासकीय मदत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news