Jalgaon : नवोदय विद्यालयामागे तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला

परिसरात खळबळ
jalgaon
नवोदय विद्यालयामागे तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला

जळगांव : भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयाच्या मागे शेतात एका तरुणाचा नग्न अवस्थेत कुजलेला मृतदेह गुरुवारी मिळून आला. त्याचा मृत्यू कसा झाला आहे याबाबत शवविच्छेदन झाल्यानंतरच समजेल. तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक ३१७/१ मधील दक्षिण बांधालगत २० ते २२ वर्षीय तरुणाचा कुजलेला व नग्न अवस्थेतील मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला कसा झाला याचा संपूर्ण अहवाल शवविच्छेदन झाल्यानंतर होणार आहे. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news