जळगाव हळहळलं ! खेळताना शेकोटीत पडलेल्या 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

Jalgaon | दहा दिवसापासून सुरू होते उपचार
jalgaon news
खेळताना शेकोटीत पडलेल्या 8 महिन्याच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू file
Published on
Updated on

जळगाव |तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घरासमोर शेकोटी पेटवलेली होती. त्या शेकोटीमध्ये देवांशूशु सुनील सोनवणे हा ८ महिन्याचा बाळ पडून गंभीररीत्या भाजला गेला होता. त्याचा दि. 20 रोजी उपचार सुरू असताना उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील नांद्रा खुर्द येथील सुनील सोनवणे हे त्याच्या परिवारासह राहतात. शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. सोनवणे दाम्पत्याला 8 महिन्या पूर्वी देवांशू मुलगा झाला होता. दि. 11 रोजी घरासमोर शेकोटी पेटवलेली होती. शेकोटी जवळ देवांशू वाकर मध्ये खेळत असताना त्याठिकाणी खेळत खेळत आला त्याचा तोल जाऊन थेट पेटत्या शेकोटीत पडला. यामध्ये देवांशू हा गंभीररीत्या भाजला गेला त्याचा चेहऱ्यापासून ते पोटापर्यंत तसेच पायालाही इजा झाली. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या 10 दिवसा पासून उपचार सुरू होते.दि. 20 रोजी शेवटी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news