जळगाव | जिल्ह्यातील 10 जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार

पत्रकार दिनानिमित्त हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन
जळगाव | जिल्ह्यातील 10 जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार
Published on
Updated on

जळगाव | पत्रकार दिना निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकारांसाठी हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन ६ जानेवारी रोजी 10:30 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्याख्याते व संपादक संजय आवटे असणार असून त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे (राजुमामा) ,आ. किशोर अप्पा पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रांतधिकारी विनय गोसावी, जेष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, राष्ट्रीय करणीसेनेचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीणसिहं पाटील, सातपुडा ऑटोचे संचालक किरण बच्छाव, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघांचे संचालक जेष्ठ पत्रकार कमलाकर वाणी, जेष्ठ पत्रकार विजय पाठक, जेष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे, राजेंद्र पाटील,पत्रकार संघांचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित राहतील.

जिल्ह्यातील १० जणांना दर्पणकार पुरस्कार

पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार जाहीर आले आहेत. यात –

प्रिंट मीडिया :

चंद्रशेखर जोशी

सुनील पाटील

सुधाकर जाधव

चेतन साखरे

इलेक्ट्रॉनिक मीडिया :

किशोर पाटील

संजय महाजन

विजय वाघमारे

डिजिटल मीडिया :

नरेंद्र पाटील, पुढारी (डिजिटल)

निलेश पाटील

छायाचित्रकार – सचिन पाटील

तरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव व पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी, नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, नागराज पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, संतोष नवले, खान्देश विभाग उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रमोद रुले, महानगराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news