Jalgaon Crime: जळगावात अमानूष घटना; दिव्यांगाला विहिरीत उलटे लटकवून विवस्त्र करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Yawal Taluka News: यावल तालुक्यातील दहिगाव येथे ५० वर्षीय दिव्यांगाला विहिरीत उलटे लटकवले
Yaval  Disabled Man Assaulted
Yaval Disabled Man AssaultedPudhari
Published on: 
Updated on: 

Yaval Disabled Man Assault Viral Video

जळगाव : माणुसकीला पूर्णपणे काळीमा फासणाऱ्या आणि क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण यावल तालुका हादरून गेला आहे.तालुक्यातील दहिगाव येथे एका ५० वर्षीय दिव्यांगाला शेतातील विहिरीत उलटे लटकवले. विवस्त्र करून बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इतकेच नव्हे, तर या अमानुष कृत्याचा व्हिडिओ काढून गावात दहशत पसरवण्यासाठी तो सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Yaval  Disabled Man Assaulted
Jalgaon Crime | बँकेतून रेकी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला राजगडमधून ठोकल्या बेड्या

विहिरीत उलटे लटकवून विवस्त्र मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील एका ५० वर्षीय दिव्यांगाला गावातीलच नितीन ऊर्फ मुन्ना पाटील आणि पंकज ऊर्फ झग्या संतोष पाटील या दोघांनी नावरे रस्त्यावरील वेडू शंकर पाटील यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तेथे या नराधमांनी दिव्यांगाचे दोन्ही पाय पकडून त्याला विहिरीच्या खोल पाण्यात उलटे लटकवले. यावेळी त्याला अमानुष मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ केला व्हायरल

हा अमानुष अत्याचार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या एका तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये या संपूर्ण थराराचे चित्रीकरण केले. केवळ मारहाण करून हे विकृत आरोपी थांबले नाहीत, तर गावात आपली दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताच संपूर्ण तालुक्यातून संतापाची तीव्र लाट उसळली असून नागरिकांनी या विकृतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Yaval  Disabled Man Assaulted
Jalgaon Crime | कमरेला देशी कट्टा खोचून फिरणारा किनगावचा तरुण गजाआड!

तिघांवर गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू

या घटनेची वाच्यता झाल्यानंतर आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर ५० वर्षीय दिव्यांग पीडिताने यावल पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी नितीन ऊर्फ मुन्ना पाटील, पंकज ऊर्फ झग्या संतोष पाटील आणि चित्रीकरण करणाऱ्या अज्ञाता विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न (खुनाचा प्रयत्न) केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे पुढील तपास करत आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. एका असहाय दिव्यांगावर झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news