

जळगाव : गेल्या दोन दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शनिवार (दि.12 ) व रविवार (दि.13) रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा अवकाळीचा फटका दिला आहे. यामध्ये रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा या चार तालुक्यांतील 49 गावांमधील 1085 शेतकऱ्यांचे अंदाजे 743.55 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, मका, ज्वारी आणि कांदा या पिकांचा समावेश आहे.
केळी – 644.25 हेक्टर
मका – 88.80 हेक्टर
ज्वारी – 7.40 हेक्टर
कांदा – 3.10 हेक्टर
असा एकूण नुकसानीचा आढावा आहे.
रावेर तालुका
19 गावांतील 732 शेतकऱ्यांचे 510 हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान.
मुक्ताईनगर तालुका
3 गावांतील 117 शेतकऱ्यांचे मका 19.30 हेक्टर, ज्वारी 5.80 हेक्टर, केळी 30.35 हेक्टर – एकूण 55.45 हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
बोदवड तालुका
3 गावांतील शेतकऱ्यांचे मका 27.50 हेक्टर, ज्वारी 0.60 हेक्टर, कांदा 3.10 हेक्टर – एकूण 31.20 हेक्टर क्षेत्र प्रभावित.
चोपडा तालुका
वादळी वाऱ्यामुळे 15 गावांतील 26 शेतकऱ्यांचे मका 42 हेक्टर, ज्वारी 1 हेक्टर आणि केळी 103.90 हेक्टर
एकूण 146.90 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे.