

जळगाव : मे महिन्यात तापमानासाठी ओळखला जाणारा जळगाव जिल्हा यंदा 2025 मध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळीमुळे चर्चेत आहे. या हवामान बदलामुळे जिल्ह्यातील 16,548 शेतकऱ्यांचे तब्बल 10267.44 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका केळी, मका, ज्वारी, बाजरी आणि कांदा या पिकांना बसला आहे.
सामान्यतः मे महिन्यात शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करतो. उन्हात वाफसा होण्यासाठी शेत मोकळी सोडली जातात. मात्र यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कोलमडली आहे. पेरणीपूर्वीच मोठ्या प्रमाणात उगवलेली पिके वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत.
5 मे – चाळीसगाव व जामनेर तालुक्यातील 11 गावांतील 262 शेतकरी, 102.70 हेक्टर नुकसान
6 मे – चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा तालुक्यात 588 गावांतील 12228 शेतकरी, 7235.08 हेक्टर नुकसान
7 मे – मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर तालुक्यात 101 गावांतील 3566 शेतकरी, 2470.36 हेक्टर नुकसान
11 व 12 मे – रावेर व चोपडा तालुक्यात 9 गावांतील 492 शेतकरी, 459.30 हेक्टर नुकसान
जिल्ह्यातील एकूण 709 गावे बाधित झाली असून पिकांचे नुकसान असे...
मूग – 28.30 हेक्टर
तीळ – 4.00 हेक्टर
मका – 1004.53 हेक्टर
ज्वारी – 248.74 हेक्टर
बाजरी – 534.00 हेक्टर
भाजीपाला – 196.20 हेक्टर
कांदा – 426.96 हेक्टर
केळी – 6565.36 हेक्टर
पपई – 261.40 हेक्टर
फळपिके – 988.30 हेक्टर
एकूण नुकसान: 10267.44 हेक्टर
मोठ्या प्रमाणावरील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी जोर धरू लागली असून मदतीसाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे.