Jalgaon Crime | दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसासह एकास अटक

पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon Crime
दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसासह एकास अटकfile
Published on
Updated on

जळगाव | पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे पोलिसांनी एका संशयित इसमाला दोन गावठी कट्टे व चार जीवंत काडतुसांसह अटक केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जारगाव चौफुली, पाचोरा परिसरात एक इसम गैरकायदेशीर गावठी कट्टे घेऊन फिरत आहे या माहितीनुसार, पोहेकॉ राहुल शिंपी आणि पोकॉदिनेश पाटील यांनी स्थानिक दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी जारगाव चौफुली येथील ए वन काटा परिसरात छापा टाकला. यावेळी संशयित अरबाज खान जहुर खान (वय २४ वर्षे) रा. अक्सा नगर, जारगाव ता.पाचोरा याच्या कंबरेजवळ त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घालत असल्याचे पाहून पो. काॅ. दिनेश पाटील यांनी त्याचे दोन्ही हात दाबून धरले. त्याच्या अंगझडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून प्रत्येकी २० हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे आणि २ हजार रुपये किंमतीचे चार जीवंत काडतुसे बरोबर सापडले. त्याच्या विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news