

जळगाव | गिरणा नदीची वाळू जळगावतच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहे. या वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अवैध उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवाल ने फोटो काढले त्यावर हवेत गोळीबार करून वाळू माफियाने दहशत निर्माण केली. याप्रकरणी मंगळवारी उशिराने नऊ जणांविरुद्ध पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील चांदसर या ठिकाणी अवैध वाळू चा उपसा होतो. तो रोखण्यासाठी गावाबाहेर साऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद होता. वाळू उपसा करण्यासाठी काही जण चाऱ्या बुजत असल्याची माहिती कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन त्यांना जाब विचारला याचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाळ कोळी यांनी त्याच्या जवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. गावात गोळीबाराचा आवाज झाल्याने धावपळ उडाली. माहिती मिळताच पारधी पोलीस गावात पोहोचले.
याप्रकरणी कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी ,मोहन गोविंदा कोळी ,कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी सर्व राहणार चादसर तालुका धरणगाव व गोपाल कोळी व दीपक कोळी राहणार वाकटुकी तालुका धरणगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, मधुकर उंबरे व सहकारी करीत आहेत.