Jalgaon Crime | भुसावळ गोळीबारातील संशयित 36 तास उलटूनही फरारच

चार पथके रवाना, मात्र हाती काहीच नाही
Gun shots Bhusawal, arrested
भुसावळ गोळीबार प्रकरणातील संशयित 36 तास उलटूनही फरारचFile Photo
Published on
Updated on

जळगाव : भुसावळ येथील जाम मोहल्ला या ठिकाणी मोटरसायकलवर येऊन गोळीबार करून एकाची हत्या केली व सराईत सुरक्षित त्याठिकाणाहुन पसार झाले. आरोपींना शोधण्यासाठी चार पथके नेमण्यात येऊन 36 तासानंतरही त्यांना पकडण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. अवैध शस्त्र मोठ्या प्रमाणात शहरात येत असून ते कोणत्या मार्गे येतात हे शोधून त्यावर प्रतिबंध घालण्यात पोलीस प्रशासन संपूर्ण पुणे अपयशी ठरलेले आहे. बारसे व राखुंडे खून असो की हा तहरीन शेख याचा खून असो यावरून तरी भुसावळच्या आजूबाजूच्या परिसरात अवैध शस्त्र सहज मिळत असल्याचे दिसून येत आहे.

भुसावळ या शहराची ओळख रेल्वे ऑर्डनन्स फॅक्टरी दीपनगर या सर्व गोष्टींनी सुद्धा आहे मात्र यामध्ये अजून एक पोलीस प्रशासनाच्या रेकॉर्डनुसार भुसावळ हे अति संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते.

भुसावळ शहरामध्ये सट्टा पट्टा मटका जुगार अड्डे व इतर अवैध व्यवसाय सुरू आहेत पण या व्यवसायांना अनेक मार्गही उपलब्ध आहे भुसावळ शहरामध्ये गुन्हेगारी पूर्वीपासूनच एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. यामध्ये खून मर्डर, मारामाऱ्या दंगली असे अनेक प्रकार झाल्याचे पोलीस नोंद मध्ये आहे.

अवैध मार्गाने येणारे बंदुका गावठी पिस्तूल पोलिसांनी पकडलेले मात्र पोलीस प्रशासन संपूर्णपणे याला आळा घालण्यात आजही अपयशी ठरलेले आहेत.

2024 मध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा भर वस्तीत जुन्या साताऱ्यामध्ये गोळ्या घालून त्यांच्या कारमध्ये हत्या करण्यात आली होती. यानंतर 2025 मध्ये दि. 10 रोजी सकाळी नमाज अदा केल्यानंतर चहा पिण्यासाठी आलेला तहरीन शेख याला सुद्धा मोटरसायकलवर येऊन गोळ्या घालून आरोपी पसार झाले.

अवैध शस्त्र सहजपणे गुन्हेगारांना शहरात शहराच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये मिळत आहे, पोलीस प्रशासन या अवैध व्यवसाय करणाऱ्या मुख्य आरोपीला आजपर्यंत आळा घालू शकलेली नाही.

मयत तहरीन शेख याचा खून होऊन 32 तासापेक्षा जास्त काल उलटून गेलेला आहेत मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक असे चारही पथकांना अजून पर्यंत आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news