जळगाव | भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्मिती मधून गोळ्यांची चाचणी घेणाऱ्या रायफली चोरीस गेल्या होत्या. दि. 28 भुसावळ- नागपूर लोहमार्गावर चोरीला गेलेल्या या तीन रायफली सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्वानपथकाने डीप नगरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या फुलगाव शिवारापर्यंत मार्ग दाखविला आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माण या कारखान्यात एके 47 च्या गोळ्यांची चाचणी घेण्यासाठी बंदिस्त भागात रोज चाचणी घेतल्या जातात. याचप्रमाणे 19 ऑक्टोबर रोजी सकाळी चाचणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने रायफली शस्त्रागृहात ठेवून कुलूप लावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने सोमवारी गोळ्यांची चाचणी घेण्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शस्त्र गृहाकडे आले असता सीलबंद केलेले कुलूप तोडलेले दिसून आले. त्यामधून पाच रायफली चोरीस गेल्याचे उघड झाले. यामध्ये तीन एके 47 सेवन, दोन गलील एसीई रायफल चा समावेश होता. मात्र वरणगाव आयुध निर्माणीय प्रशासनाने गुप्तता पाळत तीन दिवस संपूर्ण परिसरात तपास केला. मात्र त्यांना अपयश आल्याने आठ दिवसांपूर्वी वरणगाव परिषद गुन्हा नोंद केला होता.
आयुध निर्माणीत झालेल्या चोरीमुळे या प्रकरणात पोलीस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागलेली होती. गेल्या आठ दिवसापासून दोन्ही यंत्रणेला शस्त्र किंवा आरोपी मिळत नव्हते. मात्र तब्बल आठ दिवसांनी तीन रायफली भुसावळ नागपूर रेल्वे रेल्वे लोहमार्गावर मिळून आल्या. खंबा क्रमांक 475/15-17 ट्रॅकमन अनिल कुमार यांनी दिली त्यानुसार आरपीएफ अधिकारी आयुध निर्माणी प्रशासन व पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले . व त्यांनी त्या शस्त्र ताब्यात घेतले. या प्रकरणी आयुधनिर्माणीच्या एका कर्मचाऱ्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले आहे.