Jalgaon Crime News | चोरट्याने वाहनाच्या डिक्कीतून पळविले तीन लाख

जळगाव पारोळा : चोरट्याने वाहनाच्या डिक्कीतून तीन लाख केले लंपास
theft
दुचाकीच्या डीक्कीतून चोरट्याने रोकड लांबवलीfile photo

जळगाव : वाघरे येथील शेतकऱ्याने पारोळा येथील स्टेट बँकेत सोने गहाण ठेवून ४ लाख ८० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यातील ३ लाख रुपये आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. चोरट्यांनी या वाहनावर पाळत ठेवत डिक्कीतून तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवार (दि. १८) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील वाघरे येथील शेतकरी प्रकाश विठ्ठल पाटील यांनी शेती व्यवसायासाठी सोने भारतीय स्टेट बँकेत गहाण ठेवून ४ लाख ८० हजार रुपयेचे कर्ज काढले होते. त्यातून १ लाख ८० हजाराची रक्कम आपल्या जवळ ठेवून उर्वरीत रक्कम स्कुटी क्रं एम एच १९ डी वाय ३९६ च्या डिक्कीत ठेवली होती. स्टेट बँकेमधून स्कुटीने व्यंकटेश नगर येथे असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे कामानिमित्त गेले असता स्कुटी अंगणात लावून ते बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्याठिकाणी पैसे न काढता थेट स्कुटीच पळवली. त्यानंतर चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या राणी लक्ष्मीबाई नगर येथे स्कुटीच्या डिक्कीतुन तीन लाख रुपये काढून स्कुटी त्याच ठिकाणी लावून पसार झाले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास घेतला असता स्टेट बँक परिसरातूनच हे चोरटे या वृद्ध शेतकऱ्या पाळत ठेवून होते. तर अज्ञात तीन इसम त्यांच्या मागेच होते, असे दिसून आले आहे. विविध ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीत चोरट्यांबाबतचे छायाचित्र कैद झाले आहे. तर याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news