Jalgaon Crime News | दोन मोटर सायकल चोरट्यासह सहा वाहने जप्त

दोन मोटर सायकल चोरट्यासह सहा वाहने जप्त
जळगाव
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन मोटर सायकल चोरट्यासह सहा वाहने जप्त(छाया : नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : मुंबई पुणे जळगाव येथून मोटरसायकल चोरणाऱ्या दोन मोटरसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने आरोपींचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, रणजीत जाधव, दिपक चौधरी यांच्या पथकाने चोरट्शाची शोधमोहीम सुरु केली.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र उर्फ राहुल पाटील, दिपक ज्ञानेश्वर पाटील हे दोघे मोटार सायकल चोरी करून वापरत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस पथकाने मोठ्या शिताफिने चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रूपये किमतीच्या सहा मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. त्यांच्या विरोधात पारोळा, भडगाव असे जळगाव जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल असून उर्वरीत चार मोटार सायकल या पुणे व मुंबई येथून चोरी झाल्याचे सांगण्यात आल्याने त्याबाबतची शोधमोहीम सुरु आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news