Jalgaon Crime News | अखेर फरार आरोपी एल सी बी च्या ताब्यात

फरार आरोपी सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर पोलीसांच्या ताब्यात
jalgaon crime
फरार आरोपी सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांच्या ताब्यातpudhari news network
Published on
Updated on

जळगाव : सुपर शहर पोलीस तालुक्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून आरोपी शिरपूर वरून चोपडाकडे येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी फरार आरोपीला गलंगी गावाजवळ तब्येत घेतले आहे.

चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा २२०/२०२४ भादवि कलम ३९५, ३२३, २९४, ५०६ यासह आर्म ॲक्ट ४/२५ या गुन्ह्यातील फरार आरोपी सुलतान खालीद पिंजारी (रा. इस्लामपुरा, दोंडाईचा, जि.धुळे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

त्यावरुन पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे आणि अनिल जाधव, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदिप चवरे, स्थानिक गुन्हे शाखाचे कर्मचारी चोपडा शहरामध्ये पेट्रालिंग करीत असतांना सुलतान पिंजारी हा दोंडाईचाहून शिरपूरकडे येत असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. यांनी आरोपीतांस ताब्यात घेवून त्याबाबत शहानिशा करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस पथक हे खाजगी वाहनाने चोपडा येथून निघून शिरपूर रोडवरील गलंगी गावाजवळ थांबले असता त्यांना एका दुचाकीवर दोघे इसम येत असतांना व मागे बसलेला इसम हा सुलतान पिंजारी असल्याची ओळख पटली. दुचाकीस्वारांना थांबवण्यात आले. आरोपी सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर (वय २७, रा.इस्लामपुरा जामा मशिद जवळ दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे) अखेर या फरार आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news