Jalgaon Crime | मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

चार मोटारसायकल जप्त
Jalgaon Crime
मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात pudhari photo
Published on
Updated on

जळगाव : वरणगाव येथील संशयित आरोपी कमी किमतीमध्ये मोटरसायकल विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे. मध्यप्रदेश मलकापूर आणि मुक्ताईनगर या पोलीस स्टेशनमध्ये या मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात अनेक मोटार सायकल चोरी होत आहेत. त्यामुळे गोपनीय माहिती काढून पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक

डॉ. महेश्वर रेड्डी,यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की, वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदार सह मोटार सायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत आहे. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफो विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी अशांचे पथक तयार करून तात्काळ जावीर शहा याला ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

त्यावरून पथक हे साधारण ३ दिवसापासून जाबीर शहा याच्यावर पाळत ठेवून असतांना दि. 28 रोजी वरणगाव शहरातील तिरंगा चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार मोटर सायकल ज्यांची किंमत 1 लाख 55 हजार रुपये इतकी आहे त्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मुक्ताईनगर मलकापूर मध्य प्रदेश मधील खकनार या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे. मुक्ताईनगर पो.स्टे सी सी टी एन एस गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क. ३७९ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news