Jalgaon Crime: अल्पवयीन मुलगी झाली आई; पतीसह चौघांवर बलात्कार, पोक्सोचा गुन्हा

पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत
Minor Rape Case
Child Abuse Case Pudhari
Published on
Updated on

जळगांव : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह उरकून तिला मातृत्वाच्या उंबरठ्यावर ढकलल्याचा भयानक प्रकार एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात पती, सासरे, सासू आणि मुलीच्या पित्याविरुद्ध बालविवाह, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Minor Rape Case
Jalgaon Crime | 'गीतांजली एक्सप्रेस'मधून तब्बल १० लाखांचा गांजा जप्त; भुसावळ आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस'अंतर्गत धडक कारवाई!

मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील १६ वर्षीय पिडीता अल्पवयीन असल्याचे स्पष्टपणे माहीत असतानाही, तिच्या वयाची कोणतीही खात्री न करता २० जून २०२५ रोजी कमलाकर रमेश भील (गायकवाड) याच्याशी तिचा विवाह लावून देण्यात आला. या बेकायदेशीर बालविवाहानंतर अल्पवयीन पीडिता गरोदर राहिली. धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये ६ ऑगस्ट २०२६ रोजी तिने एका नवजात बालकाला जन्म दिला. अल्पवयीन मुलगी माता झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आल्यानंतर या बालविवाहाचा आणि शोषणाचा पर्दाफाश झाला.

Minor Rape Case
Jalgaon crime: भुसावळ रेल्वे यार्डातील गोडाऊनमध्ये २३ वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शारदा गोकुळ भावसार यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५(२)(i), ६५(२)(m), ३(५), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ चे कलम ४(१), ४(२), ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ अन्वये कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणी कमलाकर रमेश भील (गायकवाड) – पती (रा. आडगाव, ता. एरंडोल),दिलीप देवचंद गोकुळ – मुलीचे वडील (रा. भऊर, ता. चाळीसगाव) रमेश कौतिक भील – सासरे (रा. आडगाव, ता. एरंडोल) नबाबाई भील – सासू (रा. आडगाव, ता. एरंडोल) सर्वांना कासोदा पोलिसांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ००:५५ वाजेच्या सुमारास या चारही आरोपींना जेरबंद केले आहे. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news