Jalgaon Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

जळगाव तालुक्यातील घटना
Jalgaon Crime News
शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक Pudhari File Photo
Published on
Updated on

जळगाव : जळगाव तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.४) सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नराधमाला अटक करण्यात आली आहे. संदीप बळीराम तायडे (रा. चिंचोली ता. जळगाव) असे या नराधमाचे नाव आहे.

संदीप तायडे याने पीडीत अल्पवयीन मुलीशी गोड बोलून जवळीक साधत तिच्याशी अश्लिल वर्तन केले. १ जानेवारी ते ४ मार्चदरम्यान हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबधित मुलीला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने घरातून नेऊन नशिराबाद भुसावळ रोडकडे घेवून जात तेथील एका झोपडीत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानुसार तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार नराधम संदीप तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news