

जळगाव : येथील सुप्रीम कॉलनी मध्ये नागपूर येथून चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या एमआयडीसी पोलिसांना मिळून आल्या. त्याची बाजार मूल्य चार लाख 85 हजार रुपये आहेत याप्रकरणी मुख्य आरोपी हा मात्र फरार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना साहित्यनगर सुप्रीम कॉलनी येथे एका बंद बेकरीत लसणाच्या गोण्या चोरून आणलेल्या असल्याची माहिती मिळाली.
माहिती प्राप्त झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, अशोक काळे, रवींद्र परदेशी शशिकांत मराठे, रतन गीते, नरेंद्र मोरे, राहुल पाटील यांच्या पथकाने तपास केला असता एका बंद बेकरीमध्ये 97 लसणाच्या गोण्या आढळून आल्या. त्याची बाजारभाव किमत रुपये 4 लाख 85 हजार आहे. बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी माहिती दिली की," त्यांचा चुलत भाऊ नामे विनोद गणेश रुढे (राहणार सुप्रीम कॉलनी) याने सदरचा माल कुठून तरी विकत आणला आहे. परंतु माल खरेदी बाबत कोणतीही बिले त्यांच्याकडे दिलेली नाहीr. फक्त लसूण साठवण्यासाठी बेकरीत ठेवला आहे. त्यामुळे सदरचा मालाची बिले नसल्याने मालाबाबत मालकीबाबत संशय आल्याने एमआयडीसी पोलीसांनी सदर माल जप्त केला. विनोद रुढे यावर मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर माला बाबत अधिक तपास करता श्याम रमेश मनवाणी (राहणार, नागपूर) यांचे टाटा ओनियन कंपनी, नागपूरचा लसूण असून त्यांनी हा लसूण नागपूर येथून बुखारो-रांची या ठिकाणी पोचवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक आरोपी विनोद रुढे यांच्याकडे ताब्यात दिला होता. परंतु विनोदने सदर मालाची पोहोच न करता, स्वतःचा आर्थिक फायद्या करिता अपहार करून लसूण नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे यांना माहिती मिळाल्यानुसार मालाची विल्हेवाट लागण्याअगोदरच एमआयडीसी पोलीस स्टेशन वरील पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तो माल जप्त केला आहे. सदर माल श्याम मनवाणी यांच्या ताब्यात देण्यात आला असून त्यांनी जळगांव पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलीस अधीक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी, जळगाव संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.