Jalgaon Crime | दुचाकींवर डल्ला मारणारा 'बऱ्हाणपुरी' चोरटा गजाआड!

एलसीबी आणि शहर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; सव्वा दोन लाखांच्या ९ दुचाकी जप्त, ९ गुन्ह्यांची उकल
Jalgaon Crime | दुचाकींवर डल्ला मारणारा 'बऱ्हाणपुरी' चोरटा गजाआड!
Jalgaon Crime | दुचाकींवर डल्ला मारणारा 'बऱ्हाणपुरी' चोरटा गजाआड!
Published on: 
Updated on: 

जळगाव : जळगाव शहरात धुमाकूळ घालून दुचाकीस्वारांची झोप उडवणाऱ्या एका सराईत अट्टल दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. गोकुळ साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोरसर, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून तब्बल २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील तब्बल ९ चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

अशी आवळली पोलिसांनी 'ती' चोरीची साखळी

बळीराम पेठेतील गोपाल स्टेशनरी समोरून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना एम एच 19 इ एम -2330 अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले. तपास पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांच्या जाळ्याच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत मध्यप्रदेशातील बोरसर येथील गोकुळ पाटील याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने या चोरीसह जळगाव शहरातून आणखी ८ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

या पोलीस ठाण्यांतील गुन्हे आले उघडकीस

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या ९ दुचाकींमध्ये जळगाव शहर पोलीस ठाण्यातील ७ (गुन्हा रजि. क्र. २९१/२०२६, २५२/२०२६, २८४/२०२६, २८५/२०२६, २८८/२०२६, ३०४/२०२६ आणि अन्य एक गुन्हा) तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील २ (गुन्हा रजि. क्र. २७१/२०२६ व ३५४/२०२६) गुन्ह्यांचा समावेश आहे.

या पथकाने फत्ते केली कामगिरी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात पोउपनि दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रिजवान शेख (एलसीबी), विरेंद्र शिंदे, सतीष पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार (शहर पो.स्टे.), कुंदनसिंग बयास, मुबारक देशमुख, विकास पवार, हर्षल महाजन (बाजारपेठ पो.स्टे.) तसेच गौरव पाटील, मिलींद जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.