Jalgaon Crime News | डॉ. आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यावर भुसावळात अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल

फेसबुक लाईव्हवर 'गरळ' ओकणाऱ्या भूषण पाटीलचा माज उतरवणार; मंत्री संजय सावकारेंसह महिलांचाही अर्वाच्य भाषेत अपमान
Crime News
Crime News
Published on
Updated on

जळगाव : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विटंबना करणारे वक्तव्य करणे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री. संजय सावकारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या डोंबिवलीच्या भूषण भास्कर पाटील याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करून महामानवाचा अपमान करणाऱ्या या नराधमाचा शोध आता पोलीस घेत आहेत.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारीच्या रात्री ११:३० ते ७ फेब्रुवारीच्या पहाटे दरम्यान, आरोपी भूषण भास्कर पाटील (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याने फेसबुक लाईव्हवर एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत विखारी आणि विटंबना करणारी भाषा वापरली. "पुतळ्याचे तुकडे करीन" इथपर्यंत या विकृताची मजल गेली, ज्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

मंत्र्यांच्या पत्नीलाही दिली शिवीगाळ

केवळ महामानवाचा अपमान करून हा आरोपी थांबला नाही, तर त्याने जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे यांना 'मादरचोद' म्हणत अत्यंत घाणेरड्या भाषेत संबोधित केले. धक्कादायक म्हणजे, त्याने सावकारे यांच्या पत्नी . रजनी सावकारे आणि बंधू प्रमोद सावकारे यांच्याबद्दलही अश्लील वक्तव्ये केली. वकील जगदीश कापडे, किरण कोलते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही याने आई-बहिणीवरून शिव्या देत पोलीस प्रशासनाला आव्हान दिले आहे.

या प्रकारानंतर भुसावळचे रहिवासी विनोद अशोक सोनवणे (वय ४८, रा. पंचशील नगर) यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी भूषण पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९६, २९९, ३५२, ३५३, ३५१, १९७ सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ चे कलम ३(१)(r), ३(१)(u), ३(१)(v) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तपासाची चक्रे फिरली

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी या प्रकरणाचा तपास स्वतःच्या हाती घेतला आहे. आरोपी अद्याप फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना होण्याची शक्यता आहे. "समाजाची शांतता भंग करणाऱ्या आणि महामानवांचा अपमान करणाऱ्या एकालाही सोडले जाणार नाही," असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news