जळगाव : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना पोलिसांनी महिंद्रा बोलेरो वाहनातून नेण्यात येत असलेला मोठा गुटखा साठा जप्त केला. सेंट्रल बँक कॉलनीतील एकमुखी दत्त मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. एकूण 24 लाख 20 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि सुमारे सहा लाख रुपये किमतीचे वाहन असे मिळून जवळपास 30 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोलेरो (एमएच 19 सीएक्स) या वाहनातून बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी आणला जात होता. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली आणि विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत केला.
जप्त केलेल्या या मालामध्ये रजनीगंधा पान मसाला 6,91,200 रुपये, राजश्री प्रीमियम 2,400 पाकिटे (8 लाख 16 हजार रुपये), राजश्री सुगंधी पान मसाला 2 लाख 16 हजार रुपये, डबल ब्लॅक 60 हजार रुपये, डबल ब्लॅकचे इतर पाकिटे 18 हजार रुपये, राजनिवास 3 लाख 22 हजार 560 रुपये, करमचंद पान मसाला 52 हजार 800 रुपये, तुलसी जपानी जर्दा 1 लाख 62 हजार रुपये, नंबर वन जर्दा 75 हजार 600 रुपये आणि बोलेरो वाहन सहा लाख रुपये असा माल समाविष्ट आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.