Jalgaon Crime | इडीच्या रडारवर असलेल्या कृषी अधिकाऱ्याचे अपहरण

बोदवड उजनी रस्त्यावरील सिनेस्टाईल घटना
Jalgaon Crime
इडीच्या रडारवर असलेल्या कृषी अधिकाऱ्याचे अपहरण file photo
Published on
Updated on

जळगांव : बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी छगन जहागीर पडवी यांच्यावर इडी (प्रवर्तन निदेशालय) अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी कुर्ल्यातील अधिकारी बोदवड येथे आले असता त्यापूर्वीच त्यांचे बोदवड शहरातील उजनी रस्त्यावरून पीक पाहणीसाठी गेले असताना अपहरण करण्यात आल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली आहे. रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी (वय 57) उजनी रस्त्यावर एका शेतात पीक पाहण्यासाठी जात होते. दोन किलोमीटर अंतर असताना त्यांच्या चारचाकी वाहनाला दुसऱ्या वाहनाने अडवून काही तरुणांनी तालुका कृषी अधिकारी पाडवी यांना त्यांच्या वाहनात बसवून घेऊन गेले तर पडवी यांच्या वाहन चालकाला तेथेच सोडून दिले. वाहन चालक याने थेट कृषी कार्यालय गटात झालेल्या प्रकाराची माहिती दिली. कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले व झालेला प्रकार सांगितला. यानंतर अपहरण झाल्याचा गुन्हा रात्री 9 वाजता नोंद करण्यात आला.

छगन पाडवी यांना ताब्यात घेण्यासाठी कुर्ला पोलीस ठाण्याचे कर्मचारी बोदवड पोलीस स्टेशन मध्ये आले होते. छगन पाडवी यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड, आणि इडी (प्रवर्तन निदेशालय) या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. नंदुरबार न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. अशी माहिती त्यांनी बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news