

जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाणे हद्दत विष्णापूर गावात अडावद पोलिसांनी दहा लाखांचा 66 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच संशयिताकडून दुचाकींसह वजनकाटा असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विष्णापूर गावातील शिवाजीपाडा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गांजा विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याची गोपनीय मािहती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत सायसिंग बरकत बारेला (36, रा. विष्णापूर, ता. चोपडा) यांच्या घरात छापा टाकून एकूण 9 लाख 94 हजार 500 रुपये किमतीचा 66 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. तसेच 6 हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा 1लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.