jalgaon
रस्त्यांमध्ये भेगा, पाण्याचा निचरा नाहीpudhari photo

जळगाव | रस्त्यांमध्ये भेगा, पाण्याचा निचरा नाही

अधिकारी, अभियंते यांचे दुर्लक्ष
Published on

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 चे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्यातील महत्त्वाच्या पुलांचे काम अजूनही अपूर्ण असताना टोल वसुली सुरू झालेली आहे. तसेच या रस्त्यात पाणी निचरा होत नसताना दिसून येत आहे. तर टोल नाक्याजवळील सिमेंट काँक्रीटकरण्याच्या रस्त्यात मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहे. त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व अभियंते दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. असे असतानाही टोल वसुली मध्ये कोणताही कसूर होताना दिसत नाही.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतुकीचे मार्ग सुरळीत व्हावे व वाहतूक सुखद व जलद व्हावी यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते चिखली हा पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 झाला असून याचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. यात अजूनही नशिराबाद येथील सिमेंट फॅक्टरी जवळील जळगाव भुसावळ कडे येणाऱ्या ओवर ब्रिज चे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाले आहे ते पूर्ण नसतानाही टोल वसुलीचे काम सुरू झाले आहे.

मात्र रस्त्याच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या पाण्याचे निचऱ्यासाठी जागा करण्यात आलेली नाही. भर रस्त्यात किंवा रस्त्याच्या मधोमध पावसाचे पाणी साचलेले दिसून येते आहे. तर टोल नाक्याजवळील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर हाताच्या बोटा इतक्या अंतरांच्या भेगा पडल्या आहेत. असे असतानाही याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक व एक्झिक्युट अभियंता शिवाजी पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news