चिनावलमध्ये मध्यरात्री थरार: केळी व्यापाऱ्याने स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी

गावठी कट्ट्यातून गोळीबार करत संपवले जीवन; ५ पुंगळ्या, २ जिवंत काडतुसे जप्त केल्याने खळबळ
Revolver Accidental Firing
shootspudhari photo
Published on: 
Updated on: 

Jalgaon Chinawal Banana Trader Shoots Himself Chinawal

जळगाव : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनावल येथे एका सधन तरुण शेतकऱ्याने आणि केळी व्यापाऱ्याने राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर गावठी कट्ट्यातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. निर्मल युवराज महाजन (वय २७) असे मृताचे नाव असून, ऐन मध्यरात्री घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल महाजन हा शेतीसह मोठ्या प्रमाणावर केळीचा व्यापार करत होता. मंगळवारी (दि. ६) मध्यरात्री १२.०५ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली आतून बंद करून घेतली. त्यानंतर देशी बनावटीच्या पिस्तुलातून (गावठी कट्टा) उजव्या कानशिलावर गोळी झाडून घेत जीवन संपवले. बंदुकीच्या आवाजाने कुटुंबीयांनी धाव घेतली असता हा प्रकार समोर आला.

Revolver Accidental Firing
Jalgaon News : ‘शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्यास गय नाही’; जळगावात बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यादरम्यान घटनास्थळावरून एक देशी बनावटीचा कट्टा, पाच रिकाम्या पुंगळ्या (खोके) आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. घटनास्थळी पाच रिकाम्या पुंगळ्या कशा आल्या, तसेच हा गावठी कट्टा मृताकडे कुठून आला, याबाबत आता संशय आणि चर्चांना उधाण आले आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आर्थिक परिस्थिती संपन्न असतानाही अवघ्या २७ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले? यामागे कौटुंबिक, व्यावसायिक की अन्य काही गूढ कारण आहे, याचा सखोल तपास सावदा पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news