जळगाव | वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द ता. धरणगाव संचालित 20 टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द येथे शिपाई पदावर काम करीत होता. त्याचा फरक काढण्यासाठी 10 लाखाची लाच मागितली होती. सस्थेच्या सचिवांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द वय 54 तक्रारदार यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द ता. धरणगाव जि. जळगांव संचालित 20 टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द शिवार येथे सन 2021 पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई रिक्त पदावर नोकरीस होता. त्यावेळी विनोद मधुकर चौधरी, वय 53 वर्षे, सचिव, वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द ता. धरणगाव यांनी सुमारे 7 लाख 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे मुलास सचिव . विनोद मधुकर चौधरी यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे वय 2012 पासून फरक काढण्यासाठी कमी असल्याचे सांगुन त्यास शिपाई पदावरून गेल्या महिन्यात कमी केले होते व सदरची जागा ही सन-2012 पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश यास शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी, शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे 15 रोजी 10 लाख रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यात तात्काळ 2 लाख रुपये, शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर 3 लाख रुपये व पहिला पगार सुरु होईल तेव्हा 5 लाख रुपये अशी टप्प्या-टप्प्याने 10 लाख रुपयाची मागणी करून या पूर्वी स्वीकारलेले सुमारे 7 लाख 70 हजार रुपये विसरून जा असं सांगितले. व सदर रक्कमेचा पहिला हप्ता म्हणुन 2 लाख लाच रक्कम दि. 17 रोजी त्यांचे राहते घरी स्वतः स्विकारताना रंगेहाथ पकडले.
उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पी एस आय दिनेशसिंग पाटील, पोना/सुनील वानखेडे, पोकॉ/प्रणेश ठाकूर, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना बाळू मराठे, पोना किशोर महाजन, पोकॉ प्रदिप पोळ पोकॉ. राकेश दुसाने यांनी सापळा लावून तो यशस्वी केला. त्यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .