Jalgaon BJP Political News : जळगावला भाजपातील गटबाजी उघड

उमेदवारी वाटपावरून सुनील काळे यांचे सावकारे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन
जळगाव
जळगाव : वरणगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : वरणगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे. माजी नगराध्यक्ष आणि गिरीश महाजन यांचे समर्थक सुनील काळे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर अनोखे सदिच्छा आंदोलन करत पक्ष नेतृत्वाला थेट इशारा दिला.

सुनील काळे म्हणाले की, वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेली तर ते पक्षनिष्ठांच्या हत्यासारखेच असेल. त्यांनी स्पष्टच सांगितलं की, स्वतःला संधी मिळाली नाही तरी चालेल, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये.

फार्महाऊस आणि खडसे फॅक्टरचा आरोप

उमेदवारी ठरवताना गुप्त बैठकींना महत्त्व दिले जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. काही निर्णय फार्म हाऊसवरून होत असल्याचे आणि त्यात एकनाथ खडसे यांचा प्रभाव असल्याचे काळे यांनी सूचित केले. तालुक्यातील पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय होत असल्याने त्यांची नाराजी होती.

निष्ठावंतांना संधी दिली तर सकारात्मक संदेश जाईल

सुनील काळे म्हणाले की, 21 प्रभागांमध्ये एकनिष्ठ भाजपा कार्यकर्त्यांना संधी दिल्यास पक्षाला चांगला संदेश मिळेल. अन्यथा पक्षासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा त्यांनी इशारा दिला. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठीही आपण इच्छुक असल्याचे सांगून याबाबत गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केल्याचेही याप्रसंगी नमूद केले.

माजी नगराध्यक्षाने मंत्र्यांच्या कार्यालयासमोर थेट आंदोलन केल्याने जळगाव भाजपमध्ये खळबळ माजली आहे. उमेदवारीवरील या तणावाला पक्ष नेतृत्व कसा प्रतिसाद देते, याकडे आता लक्ष लागले आहे.

मला नाकारले तरी चालेल, पण माझ्यासोबत काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाऊ नये, ही माझी अपेक्षा आहे. वेळप्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांची हत्या मी होऊ देणार नाही! सावकारे साहेबांना हात जोडून विनंती आहे की, वरंगावमधील २१ प्रभागांमध्ये एकनिष्ठ भाजपा कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी.

सुनील काळे , गिरीश महाजन समर्थक व वरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news