

जळगाव : इतर जिल्ह्यांच्या मानाने जळगाव जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभ घेणारे 1000 लाभार्थी जिल्ह्यात आहेत. ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. शेतकरी उद्योगपती झाल्यास चांगले होईल असेही वक्तव्य यावेळी त्यांनी केले
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 2018 ते 2025 या काळात जळगाव जिल्ह्यामध्ये 1000 युवकांनी या महामंडळाचा लाभ घेतला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी हे जातीचे प्रमाणपत्र मिळत असल्याने त्यांना ओबीसी आर्थिक मागास गटाकडे मागणी करावी लागत आहे. मात्र यापुढे एल वाय मधून तो दाखला घेतल्यास त्यांना यामधून लाभ घेता येईल तसेच शेतकरी यांना उद्योगपती करण्यासाठी मदत करणारे उद्योगपती झाल्यास चांगले होईल असे ते म्हणाले तसेच व्यावसायिक वाढल्यास समाजाची ही प्रगती होईल व ही संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर या योजनांचा लाभ काय आहे व याचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले, 2018 नंतर मधल्या कार्ड सोडल्यास राष्ट्रीयकृत बँक व क्रेडिट खाजगी बँकांनी उद्योजकांना चांगली मदत केली असल्याचे ते म्हणाले सध्याला राज्यात एक लाख मराठा उद्योग तयार झाले आहेत दहा कोटी पर्यंत कर्ज वाटप झालेला आहे सरकारने आतापर्यंत एक लाख कोटीचा परतावा केलेला आहेत. यासाठी आता दर तीन महिन्यांनी हे अशा आढावा बैठका घेऊन तसेच गावोगावी मराठी युवकांना कसा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.