

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठ पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसून बनावट आधारकार्ड मिळून आले आहे. यावरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन मुलींसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशातील दोन मुली या रेल्वेने त्यांचे तीन जण प्रवास करून भुसावळ रेल्वे स्थानकावर आले होते. त्यानंतर मंगळवार (दि.27) रोजी रेल्वे स्थानकावरून शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल अतिथी येथे रूम घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी आधार कार्डची मागणी करण्यात आली. यावेळी त्यांनी झेरॉक्स दाखवल्यामुळे ओरिजिनल आधार कार्डची मागणी करण्यात आली, मात्र ते ओरिजिनल आधार कार्ड देऊ शकले नाही. यामध्ये तानिया मुळाशीर अहमद (वय 26 रा. उतरफान हातिपाडा जिल्हा ढाका बांगलादेश), करीमा बोकुलमिया अख्तर (वय 22, मोहरीच्या कन्नय्या नगर बाव्हम बरिया बांगलादेश) या दोघींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्या मुंबई येथील एका दीदी नामक व्यक्तीकडे कामानिमित्त जाणार असल्याचे सांगितले.
यामधील दोन आरोपी जलाल व सैफुल पूर्ण या दोघांनी या तरुणांना बनावट आधार कार्ड बनवून दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सोपान पाटील हे पुढील तपास करीत आहेत.