Jalgaon Ashadhi Wari Special Train : पांडुरंगाच्या भेटीला मध्य रेल्वेची जय्यत तयारी

जळगाव : आषाढी वारीसाठी विशेष गाड्यांची घोषणा
Ashadhi Wari Special Train
Ashadhi Wari Special TrainPudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या गजरात भक्तगण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंना अधिक सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये १ जुलै ते १० जुलै २०२५ या कालावधीत विविध मार्गांवरून 'आषाढी विशेष गाड्या' धावणार आहेत.

विशेष गाड्यांचा तपशील असा...

  • नागपूर – मिरज विशेष गाड्या (४ फेऱ्या)

  • गाडी क्र. 01205: नागपूरहून प्रस्थान – ०८:५० (०४ व ०५ जुलै), मिरज आगमन – दुसऱ्या दिवशी ११:५५.

  • गाडी क्र. 01206: मिरजहून प्रस्थान – १२:५५ (०५ व ०६ जुलै), नागपूर आगमन – दुसऱ्या दिवशी १२:२५.

  • थांबे: अजनी, वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पंढरपूर, इ.

  • रचना: २ एसी-३ टियर, १० स्लीपर, ४ सामान्य व २ सामानवाहू डबे.

  • न्यू अमरावती – पंढरपूर विशेष गाड्या (४ फेऱ्या)

  • गाडी क्र. 01119: न्यू अमरावतीहून प्रस्थान – १४:४० (०२ व ०५ जुलै), पंढरपूर आगमन – दुसऱ्या दिवशी ०९:१०.

  • गाडी क्र. 01120: पंढरपूरहून प्रस्थान – १९:३० (०३ व ०६ जुलै), न्यू अमरावती आगमन – दुसऱ्या दिवशी १२:५०.

  • थांबे: अकोला, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, इ.

  • रचना: पूर्ववत.

  • खामगाव – पंढरपूर विशेष गाड्या (४ फेऱ्या)

  • गाडी क्र. 01121: खामगावहून प्रस्थान – ११:३० (०३ व ०६ जुलै), पंढरपूर आगमन – दुसऱ्या दिवशी ०३:३०.

  • गाडी क्र. 01122: पंढरपूरहून प्रस्थान – ०५:०० (०४ व ०७ जुलै), खामगाव आगमन – १९:३०.

  • थांबे: भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, इ.

  • रचना: पूर्ववत.

  • भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (२ फेऱ्या)

  • गाडी क्र. 01159: भुसावळहून प्रस्थान – १३:३० (०५ जुलै), पंढरपूर आगमन – दुसऱ्या दिवशी ०३:३०.

  • गाडी क्र. 01160: पंढरपूरहून प्रस्थान – २२:३० (०६ जुलै), भुसावळ आगमन – दुसऱ्या दिवशी १३:००.

  • थांबे: जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, इ.

  • रचना: १६ सामान्य डबे व २ सामानवाहू डबे.

आरक्षण व तिकीटाबाबत सविस्तर माहिती अशी...

  • विशेष गाड्यांचे आरक्षण (गाड्या क्र. 01205, 01206, 01119, 01120, 01121, 01122) १६ जून २०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in वर सुरू होईल.

  • अनारक्षित तिकिटे UTS मोबाईल अ‍ॅप किंवा स्थानिक काऊंटरवर सुपरफास्ट दराने उपलब्ध असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news