Jalgaon : मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात तालुकास्तरावर 'अनुभूती' प्रथम क्रमांकावर

जिल्हा नियोजन भवन येथे पारितोषिक वितरण समारंभ
जळगाव
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुकास्तरावरील प्रथम पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते स्विकारताना अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या प्राचार्य रश्मी लाहोटी व शिक्षिका-शिक्षकPudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानांतर्गत खासगी संस्था गटातील स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम या शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी रूपाली वाघ, मनोज दाडकर आणि सर्व शिक्षक-शिक्षिकांनी मिळून हा सन्मान स्वीकारला.

स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभानंतर तालुकास्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील 21 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चावडी वाचन आणि पालक सभा यासारख्या उपयुक्त अशा उपक्रमांची माहिती देत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. अनिल झोपे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शाळांचा खरा विकास तेव्हाच होतो, जेव्हा विद्यार्थी समाजोपयोगी कार्यात भाग घेतात. 'माझी शाळा, सुंदर शाळा'सारखे उपक्रम आनंददायी ठरून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक प्रेरणास्थान बनतात. त्यातून समाजोपयोगी पिढी घडविणे शक्य होते आहे.”

जळगाव
कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्ज्वलन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, सोबत डॉ. अनिल झोपे,विकास पाटील, सरला पाटील, खलील शेखPudhari News Network

कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, डॉ. अनिल झोपे (प्राचार्य, डाएट), विकास पाटील (प्राथमिक शिक्षणाधिकारी), सरला पाटील (गट शिक्षणाधिकारी), विजय पवार (शा. पो. आ. अधीक्षक), खलिल शेख (प्रशासन अधिकारी), जितेंद्र चिंचोले, नरेंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विभागीय स्तरावर विजयी झाल्याने जि.प.शाळा पिलखेडा ता. जळगाव, माध्यमिक शाळा करंज ता. जळगाव, तर जळगाव तालुकास्तरावर प्रथम जि. प. शाळा विटनेर,द्वितीय जि. प. शाळा जळगाव खु, तृतीय जिल्हा परीषद शाळा तरसोद आणि खासगी संस्था गटातील जळगाव तालुकास्तरावर प्रथम अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, द्वितीय ब. गो. शानबाग माध्यमिक विद्यालय, तृतीय सार्वजनिक विद्यालय आसोदा यांचा सुद्धा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गट शिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनुभूती इंग्लिश मिडीअम शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. सुशील पवार यांनी सूत्रसंचालन केले. विजय पवार यांनी आभार मानले. शिक्षण विभाग गट साधन केंद्र कर्मचारी व सर्व मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news