

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर इच्छादेवी चौकात पोलिस चौकीशेजारीच अवैधरित्या स्वयंपाक गॅसमधून प्रवासी वाहतूकदार वाहनांमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात 11 जण जखमी होऊन भाजल्याची घटना मंगळवारी (दि.5) रोजी घडली होती. यामध्ये शनिवारी (दि.9) भरत सोमनाथ दालवाले (वय 55, राहणार. यमुनानगर) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
इच्छादेवी चौकातील मंगळवारी (दि.5) रोजी घडलेल्या स्फोटाच्या प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री पावणेदहाला पोलिस नाईक इम्रान रहिम बेग यांच्या तक्रारीवरून दानिश अनिस शेख (रा. तांबापुरा) याच्याविरुद्ध मानवी जीव धोक्यात येईल, याची जाणीव असताना घरगुती गॅस सिलिंडर बेकायदेशीररित्या मशिनच्या साह्याने वाहनात भरत असताना स्फोट होऊन दहा जण जखमी झाल्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुण ज्या ठिकाणी गॅस भरून देत होता ते दुकान (रिफिलिंग सेंटर) इसा शेख हमीद उर्फ बेपारी याचे असून, तांबापुरातील नगरसेवकाने त्याला पोलिस परवानगी मिळवून दिल्याचे घटनास्थवरील जखमींतर्फे सांगण्यात येत आहे.
जळगाव शहरातील खाजगी वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरताना इच्छा देवी चौकामध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन आजूबाजूच्या दुकानांना आग लागली. यामध्ये आगीमध्ये सुमारे 11 जण भाजले गेले होते. ही घटना मंगळवारी (दि.5) रोजी सायंकाळी घडली होती. या अपघातात दानिश शेख (वय 46) गॅस सेंटर चालकाचा मुंबई येथे उपचार सुरू असताना गुरुवारी (दि.7) रात्री मृत्यू झाला. या प्रकरणातील दुसरे जखमी भरत सोमनाथ दालवाले (वय 55) यांचा शनिवारी (दि.9) मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हा पोलीस पोलीस प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबादी केली.
एमआयडीसी परिसरामध्ये अनेक अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये गॅस सिलेंडरचा अवैध धंदे ठीकठिकाणी सर्रासपणे सुरू आहे. मात्र अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास कमी पडत आहे. निवडणुका सुरू असल्याने अधिकारीवर्ग आओभगत करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना मार्ग मोकळे झालेले आहेत. अवैध धंद्यामध्ये सट्टा, पत्ता, जुगार, गॅस रिफिलिंग यासारखे धंदे जोमात सुरू असतांना दिसून येत आहेत.