Jalgaon news: पशुधन अधिकारी मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

Animal husbandry officer death jalgaon news: गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते, दरम्यान त्यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांना संशय आला
death
death pudhari File Photo
Published on
Updated on

जळगाव: यावल शहरातील विस्तारीत वसाहती परिसरात एका घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली असता, पोलिसांनी घराची तपासणी केली. दरम्यान पशुधन अधिकारी मृत अवस्थेत आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील पशुअधिकारी भगुरे हे आत्माराम गुरूजी यांच्या मुश्तफा खान यांच्या ग्लोबल स्कूलच्यासमोर असलेल्या घरात राहात होते. ते मूळचे सेलू जिल्हा परभणीचे रहिवाशी आहेत. ते यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत होते. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते. आज (दि.२५) त्यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिले असता, रतनलाल भगुरे हे मृत अवस्थेत आढळून आले.

प्राथमिक तपासानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ते या घरात एकटेच राहत असल्याने अचानक आलेल्या आजारात त्यांना उपचार मिळू शकले नाहीत, असे बोलले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरू असून, घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अचानक झालेल्या मृत्यूने यावल शहरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news