जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांची मालिकांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. रस्त्यांवरील अपघातामध्ये एका विवाहीतेसह मुलगी ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) जाग येऊन त्यांनी तत्काळ रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला आहे.
विवाहीता दिक्षिता व पायल दुचाकीने पुलावरून जात असताना पूल उतरताना त्यांची दुचाकी ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये आली. दोन्ही वाहनांच्यामध्ये दुचाकी आली आणि त्यातल्या त्यात महामार्गावरील रस्त्यावर मधोमध खड्डा असल्यामुळे दुचाकी घसरली आणि दोघी ट्रकखाली आल्या. ट्रकखाली आल्यामुळे महिला आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील खड्ड्यांनी दोन जणींचा बळी घेतल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
दोन जीव गेल्यावर रस्त्यावर थिगळ लावले
बाकी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी अपघाताची वाट पाहणार का! नागरिकांचा संतप्त सवाल
रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे रस्त्याकडे दुर्लक्ष, अधिकारी फोन घेत नाही
आमदार म्हणतात अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले जाणार
भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे आता 56 मध्ये बदल करण्यात आला असून या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. जळगाव शहरातून जाणारा या महामार्गावरील अपघातांचा आकडा वाढत आहे. या महामार्गावरच खोटेनगर ते मानराज पार्क दरम्यानच्या उड्डाणपुलावर हा अपघात घडला.
रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे एक विवाहीता ही मुलीसह ट्रक खाली येऊन चिरडली गेली. नागरिकांचा रोष व अधिकाऱ्यांनी कान उघडणी केल्यानंतर न्हाईने सर्विस रोडवर इतर ठिकाणी पडलेले खड्डे बुजवले. मात्र यावेळी केवळ ज्या ठिकाणी अपघात झाला तेथीलच खड्डे बुजविण्यात आले तर परिसरातील इतर खड्ड्यांचे काय ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. कालिंका माता ते मन्यारखेडा हा रस्त्यावर देखील धोकादायक खड्डे झाले असून रस्ते धूळयुक्त झालेले आहेत. या रस्त्याकडे भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण हे अपघातामध्ये अजून काहींचा मृत्यू झाल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करणार आहे का?
सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण चे संचालक व अभियंते कोणीच याकडे लक्ष देण्यास तयार नाही तर चौपदरीकरण असलेले सर्विस रस्त्यांची चाळण झाली आहे. याबाबत आमदारांना विचारणा केली असता जिल्हाधिकारी भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांना आदेशित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
तर भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण चे संचालक व मुख्य अभियंता शिवाजी पवार व दुरुस्ती विभागाचे अभियंता रुपेश गायकवाड यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही प्रतिसाद दिलेला नाही. जळगाव जिल्ह्याचे आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी व शिवाजी पवार यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर खड्डे बुजवण्यास येतील.