मुक्ताईनगरजवळील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातPudhari News Network
जळगाव
Jalgaon Accident Update | लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात: दोन ठार, 20 जखमी
सिहोरी ट्रॅव्हल्स बसचा ट्रक यांचा अपघात: मुक्ताईनगर पोलिसांनी मदतकार्य हाती घेतले
जळगाव : मुक्ताईनगरजवळील राष्ट्रीय महामार्गावर बुधवार (दि.4) रोजी आज पहाटे सिहोरी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसचा ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत.
सिहोरी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस सुरतहून निघून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरकडे जात होती. कोथळी गावाजवळील उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. हा अपघात बुधवार (दि.4) रोजी पहाटे चारच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

