Jalgaon Accident | क्रुझर- कारचा अपघात, नाशिकच्या दोन महिला ठार तर 12 भक्तगण जखमी

जामनेर तालुक्यातील बोदवड रस्त्यावरील माल दाभाडीजवळ अपघात
Jalgaon Accident | क्रुझर- कारचा अपघात, नाशिकच्या दोन महिला ठार तर 12 भक्तगण जखमी
Jalgaon Accident | क्रुझर- कारचा अपघात, नाशिकच्या दोन महिला ठार तर 12 भक्तगण जखमी
Published on
Updated on

जळगाव : सिहोरहून येणाऱ्या भक्तगणांच्या क्रुझरने कारला दिलेल्या जोरदार धडकेमुळे नाशिकच्या दोन महिलांच्या जागीच मृत्यू झालेला आहे.12 जण जखमी झाले आहेत जामनेर तालुक्यातील बोदवड रस्त्यावरील माल दाभाडीजवळ रविवारी संध्याकाळी 6:45 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

यामध्ये चंद्रकला सूर्यकांत माळी वय 52 राहणार नाशिक, व रत्न बाळू भांबरे वय 55 राहणार नाशिक या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे जखमींमध्ये जामनेर तालुक्यातील दहा नाशिक मधील एक तर जळगाव मधील एक चा समावेश आहे त्यांना खाजगी रुग्णालयात व जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.

जामनेर व खादगाव तालुका जामनेर येथील काही महिला मध्य प्रदेशातील शिवर येथील पंडित प्रदीप शर्मा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना क्रूजर गाडीने नाशिकच्या कारला जोरदार धडक दिली यात कारमधील नाशिकच्या रहिवासी दोन महिलांचा जागेत मृत्यू झाला तर एकूण बारा जण जखमी झाल्याची माहिती आहे जामनेर मधील उपजिल्हा रुग्णालय तर्फे देण्यात आली आहे.

यामध्ये मनीषा मनोज पवार वय 35 राहणार नेरी चैतन्य मनोज पवार वय 14 राहणार नेरी वैशाली मधुकर पवार वय 39 राहणार खादगाव नीता मधुकर चिंचोले वय 40 राहणार खादगाव स्वाती गोकुळ चिंचोली वय 30 प्रीती गजानन बिराडे काव्य गजानन बिराडे नंदा विनोद माळी वय 40 राहणार जळगाव हर्षल माळी राहणार नाशिक पद्माबाई सुरेश पाटील वय 70 उज्वला एकनाथ निकम व 39 सरला तायडे हे जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरू आहे काही जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलेले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news