Jalgaon Accident | जळगावात महामार्गाने घेतला पुन्हा बळी ; कंटेनरने एकाला चिरडले

रात्री उशिरापर्यंत नागरिकांचा रास्तारोको
Accident
जळगावात महामार्गाने घेतला पुन्हा बळीFile Photo
Published on
Updated on

जळगाव | आजवर अनेकांचे बळी घेतलेल्या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री पुन्हा एक जण अपघातात ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

या संदर्भातील माहिती अशी की, आशाबाबा नक्षरातील विजय नामदेव भोई ( वय 50 ) यांची शिव कॉलनी स्टॉपजवळ पानटपरी आहे. दि. 5 रोजच्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने शिव कॉलनी स्टॉपजवळ महामार्गावर येत असतांना गुजराल पेट्रोल पंपाकडून भरधाव वेगाने येत असलेल्या (एमएम09 एजी 1138) क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडले. कंटेनर चालकाने सुमारे 60 फुटापर्यंत त्यांना फरफटत नेले. यात विजय भोई यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news