Jalgaon Accident | केमिकल्सच्या टँकरने कंटेनरला उडवले; भीषण अपघातानंतर टँकरने घेतला पेट, वाहनाची अवस्था विदारक!

​पारोळ्याजवळील सबगव्हाण टोलनाक्यावरील थरार; एकाचा मृत्यू, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प
Jalgaon Accident | केमिकल्सच्या टँकरने कंटेनरला उडवले; भीषण अपघातानंतर टँकरने घेतला पेट, वाहनाची अवस्था विदारक!
Published on
Updated on

जळगाव : धुळे-पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील सबगव्हाण टोलनाक्यावर आज एक भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका टोल्युइन डायआइसोसायनेट हे केमिकल असलेल्या टँकरने टोलनाक्यावर पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टँकरचा टायर फुटून त्याने जागीच पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत टँकरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

​अग्निशामक दलामुळे मोठा अनर्थ टळला!

​अपघाताची माहिती मिळताच पारोळा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत टँकरला लागलेली आग आटोक्यात आणली. सुदैवाने, टँकरमध्ये असलेले अत्यंत घातक केमिकल सुरक्षित असून, वेळेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

​महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

​या भीषण अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ रोखण्यात आली होती. यामुळे रस्त्यावर सुमारे अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

​टँकरमध्ये होते अत्यंत घातक केमिकल!

अपघातग्रस्त टँकरमध्ये (GJ-18 BV-8315) 'टोल्युइन डायआइसोसायनेट' (TDI) हे अत्यंत क्रियाशील (highly reactive) केमिकल होते. हे केमिकल गुजरातकडून ओडिसाकडे नेले जात होते. या केमिकलचा वापर प्रामुख्याने फोम, कोटिंग्ज आणि चिकटवणारे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. हे केमिकल हवेच्या संपर्कात येऊन मोठा भडका उडू शकला असता, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे पुढील धोका टळला.

​वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू

​घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि क्रेन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील १० मिनिटांत वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news