जळगांव : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची मुख्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस उप अधीक्षक म्हणून योगेश गंगाधर ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांवचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालय येथे अंतर्गत बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकुर यांची बदली झाल्याने त्यांनी (दि. २७ ) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव चा कार्यभार स्विकारला.
तसेच ला.प्र.वि.जळगांव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांची ला.प्र.वि.नाशिक अशी अंतर्गत बदली झाली आहे. त्यांच्या ऐवजी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांची ला.प्र.वि.जळगांव येथे बदली झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव युनिट तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधून निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असून सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तक्रारी संबंधी नागरीकांनी संपर्क साधावा.