Jalgaon | नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर 'सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न' केल्याचे गुन्हे दाखल

8 जणांना घेतलं ताब्यात
Jalgaon
नायलॉन मांजा विक्री विक्रेत्या 8 जणांना घेतलं ताब्यात Pudhari
Published on
Updated on

जळगाव | येथील शनी पेठ पोलिस स्टेशन परिसरात मकर संक्रात निमित्त पंतग व मांजा विक्री करण्याचे दुकाने लागली होती मात्र यावेळी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न" या सदराखाली 05 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील नायलॉन मांजा विक्री करणारे 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही मोहीम अजून दोन दिवस सुरू राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीचे निमित्ताने तसेच काही लोक छंद म्हणून पतंग उडवतात. ब-याच ठिकाणी पतंगबाजी मध्ये वापरण्यात येणारा दोरा हा नायलॉन पासून बनलेला असतो. नायलॉन मांजा हा सहजासहजी तुटत नसल्याने रस्त्याने येणारे जाणारे मोटार सायकल चालक तसेच सायकलवरून जाणारे विद्यार्थी यांचे गळ्यात अडकून नागरीक व विद्यार्थी जखमी होण्याचे तसेच नायलॉन मांजामुळे जीव जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच नायलॉन मांजामुळे पक्षी व प्राण्यांची जिवीत हानी होत आहे. नायलॉन मांजा हा अविघटनशील असल्याने पर्यावरणाचा देखिल -हास होत आहे. पतंग उडवतांना नॉयलॉन मांजाचा वापरामुळे होणाऱ्या दुर्घटनांना प्रतिबंध होणेसाठी मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, औरंगाबाद यांचे Suo Moto PIL क्र. 08/2020 चे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांचेकडील आदेशने नायलॉन मांजा विक्री प्रतिबंधीत केलेली आहे. त्याचप्रमाणे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणा-याविरुध्द कहक कारवाया करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. . महेश्वर रेड्डी ,. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते . तसेच. उपविभागीय पोलीस अधिकारी . संदीप गावीत . यांनी सुचना केलेल्या त्यानुसार 13 व 14 रोजी पतंग विक्री साठी नायलॉन मांजा विक्री करणारे व हाताळणारे इसमाविरुध्द कारवाईची मोहीम राबवण्यात आलेली आहे.

या कारवाई दरम्यान भा. न्या. संहीता कलम 110,223 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5,15 अन्वये "सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न" या सदराखाली 05 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या गुन्ह्यातील नायलॉन मांजा विक्री करणारे मयुर दत्तु भोई वय-23 वर्षे रा., सदगुरुनगर (आयोध्यानगर) प्लॉट नं. 32, सर्व्हे नं. 42 जळगाव, भुषण गजानन बेलेकर वय- 24 वर्षे रा.डि.एन.सी. कॉलेज जवळ जळगाव, अफवान निहाल खान वय-24 वर्षे रा. काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव , परवेझ शेख शफी शेख वय-24 वर्षे रा. काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव , दर्शन संजय शिंपी वय-19 वर्षे रा. आशाबावनगर महादेव मंदीरासमोर जळगाव , गितेश भरत रौंदाने वय 18 वर्षे रा. आशाबाबानगर जळगाव ,प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे वय-21 वर्षे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव , तुषार सुनिल माळी वय-23 वर्षे रा. विठोबानगर जुना खेडी रोड जळगाव अशा 08 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर इसमांकडून 11 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील 2 दिवसात देखिल सदर मोहीम अशाच प्रकारे राबवण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे शनिपेठ पोलीस स्टेशन जळगाव यांनी पत्रकार द्वारे कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news