वरणगाव व पारोळा येथील कर्मचारी मोटरसायकलवर सूट घेऊन जात होते.(छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव : जिल्ह्यातील 16 अ ब क नगरपालिकेतील अग्निशामक विभागाला 96 फायर सुट वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक नगरपालिकेला सहा फायर सुट देण्यात आलेले आहेत.
धरणगाव नगरपालिकेने सूट घेण्यासाठी ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केले.(छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, फैजपूर, नशिराबाद, पारोळा, रावेर, सावदा, यावल, वरणगाव, भडगाव, एरंडोल या नगरपालिकेतील अग्निशामक दलांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी सहा फायर प्रोडक्शन किट (फायर सुट) प्रदान करण्यात आले.
फायर प्रोडक्शन किट (फायर सुट) अडीचशे डिग्री तापमानामध्ये हा सूट घालून अग्निशामक दलाचा जवान आग विझवण्यासाठी जाऊ शकतो. केमिकल कंपनीची आग सोडून इतर कर्मचारी आगीत हा सूट घालून जाऊ शकतो.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव

