

जळगाव : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम सोमवार (दि.2) रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात नागरिकांकडून एकूण 95 अर्ज प्राप्त झाले.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार (संजय गांधी योजना) डॉ. उमा ढेकळे, नायब तहसीलदार (करमणूक शाखा) राहुल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्यांच्या तात्काळ निकाली निघण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. अर्जांचा विभागनिहाय आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.