

जळगाव : खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याच्या नावाखाली शहरातील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाला ५ लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या महिलेसह पुरुषाला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक ५५ वर्षीय व्यावसायिकाच्या परिचयातील असलेले एका हॉटेलचे मालक संशयित आरोपी वकील उखा राठोड (वय ३०, रा. रामदेववाडी ता. जळगाव) यांनी जुलै महिन्यामध्ये एका ३८ वर्षीय वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची ओळख करून दिली. त्यानंतर या व्यावसायिकाने ओळख करून दिलेल्या महिलेसोबत सहमतीने संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी एकूण ३ हजार रुपये त्याने दिले. नंतर वेळोवेळी तो पैसे देत गेला. असे रोखीने १० हजार ५०० व ऑनलाइन ६१ हजार रुपये व्यवसायिकाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला आणि वकील राठोड याला १५ हजार रुपये दिले आहेत.
काही दिवसांपासून महिलेने व्यवसायिकाला ५ लाख रुपयांची मागणी करीत आहे. ५ लाख रुपये दिले नाही तर माझ्यावर आणि माझ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात करेल अशी धमकी व्यवसायिकाला दिली. त्यामुळे व्यवसायिकाने शनिवार (दि.7) रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि.7) दुपारी २ वाजेच्या सुमारास सापळा रचला व त्या महिलेला फिर्यादी व्यावसायिकाने ४ लाख रुपयांचा चेक आणि १ लाख रुपये रोख दिल्यानंतर पोलिसांनी महिलेसह वकील राठोड याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांची दुचाकी देखील जप्त केली आहे. व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.